SSC CGL 2025
SSC CGL 2025 : नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये स्पर्धा परीक्षांमधील सर्वात लोकप्रिय व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या परीक्षांपैकी एक म्हणजे SSC CGL (Combined Graduate Level Exam). दरवर्षी लाखो पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करतात. 2025 सालासाठी SSC CGL 2025 ची अधिसूचना जाहीर झाली असून यंदा तब्बल 14,582 जागा विविध विभागांमध्ये भरल्या जाणार आहेत. या लेखामध्ये आपण SSC CGL 2025 ची संपूर्ण माहिती—पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, पगार संरचना, परीक्षा पद्धती व निवड प्रक्रिया—सविस्तर पाहणार आहोत.
SSC CGL 2025 – महत्वाच्या तारखा (ssc cgl 2025 application form date)
- अर्जाची सुरुवात – 9 जून 2025
- अर्जाची शेवटची तारीख – 4 जुलै 2025
- टियर-1 परीक्षा – 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2025
- टियर-2 परीक्षा – डिसेंबर 2025
- ही वेळापत्रक लक्षात घेता उमेदवारांकडे जवळपास दोन महिने प्रभावी तयारी करण्यासाठी उपलब्ध आहेत.
अधिक वाचा : पशुसंवर्धन विभाग योजना २०२५
एकूण पदसंख्या व गटांचे वर्गीकरण
यंदा एकूण 14,582 पदे भरली जाणार असून ती दोन प्रमुख गटांमध्ये विभागलेली आहेत:
ग्रुप B पदे (Level-6, Level-7)
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) – विविध मंत्रालये व विभाग
- इन्स्पेक्टर, सब-इन्स्पेक्टर
- डिव्हिजनल अकाउंटंट इत्यादी
ग्रुप C पदे (Level-4, Level-5)
- टॅक्स असिस्टंट
- ऑडिटर
- अकाउंटंट
- अपर डिव्हिजन क्लर्क (UDC) इत्यादी
पगार संरचना (Pay Level अनुसार)
- लेव्हल-7 (₹44,900 – ₹1,42,400)
- बेसिक पगार: ₹44,900
- DA (Dearness Allowance): सुमारे 53%
- HRA + इतर भत्ते
- इन-हँड पगार: अंदाजे ₹85,000 – ₹90,000
पदे : Assistant Section Officer (MEA, IB, Railway, CSS, Electronics Ministry इ.)
सर्वोत्तम पद मानले जाते.
- लेव्हल-6 (₹35,400 – ₹1,12,400)
- बेसिक पगार: ₹35,400
- इन-हँड: अंदाजे ₹65,000 – ₹75,000
पदे : Inspector, Divisional Accountant, Preventive Officer,etc,,.
- लेव्हल-5 (₹29,200 – ₹92,300)
- बेसिक: ₹29,200
- इन-हँड: ₹50,000 – ₹55,000
पदे: Auditor, Accountant इ.
- लेव्हल-4 (₹25,500 – ₹81,100)
- बेसिक: ₹25,500
- इन-हँड: अंदाजे ₹40,000 – ₹45,000
पदे: Tax Assistant, UDC, Clerk इ.
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 30 वर्षे (पदनुसार वेगवेगळे)
- आरक्षणानुसार वयोमर्यादेत सवलत:
- SC/ST – 5 वर्षे
- OBC – 3 वर्षे
- PwD – 10 वर्षे
- Ex-Servicemen – सरकारनियमाप्रमाणे
शैक्षणिक पात्रता (Eligibility)
सर्वसाधारणपणे: पदवीधर (Any Graduate) उमेदवार अर्ज करू शकतात.
विशेष पदांसाठी:
- Junior Statistical Officer (JSO): गणित विषयासह बारावीत 60% गुण किंवा गणित/सांख्यिकी विषय पदवी पातळीवर असणे आवश्यक.
- Investigator Grade-II: गणित/सांख्यिकी/अर्थशास्त्र विषयाची पदवी आवश्यक.
परीक्षा पद्धती (Exam Pattern)
टियर-1 (CBT – Objective)
- कालावधी: 1 तास
- एकूण प्रश्न: 100
- एकूण गुण: 200
विषय:
- General Intelligence & Reasoning – 25 प्रश्न (50 गुण)
- General Awareness – 25 प्रश्न (50 गुण)
- Quantitative Aptitude – 25 प्रश्न (50 गुण)
- English Comprehension – 25 प्रश्न (50 गुण)
- निगेटिव्ह मार्किंग: -0.50 प्रति चुकीचे उत्तर
टियर-2 (CBT – Objective + Skill Test)
पेपर-1 (सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य)
- गणित (Quantitative Aptitude)
- रिजनिंग
- इंग्रजी
- General Awareness
- Computer Knowledge Module
- Data Entry Speed Test (DEST – 20 मिनिटे)
पेपर-2 (फक्त JSO साठी)
- Statistics (100 प्रश्न – 200 गुण)
- पेपर-3 (फक्त विशिष्ट पदांसाठी)
- General Studies (Finance & Economics)
किमान पात्रता गुण (Minimum Qualifying Marks)
- UR (General): 30%
- OBC/EWS: 25%
- इतर सर्व: 20%
निवड प्रक्रिया (Selection Process)
- टियर-1 परीक्षा (Screening, फक्त Qualifying नाही)
- टियर-2 परीक्षा (Paper-1 अनिवार्य + Paper-2/3 पदनिहाय)
- DEST/Computer Test
- Final Merit List: टियर-1 आणि टियर-2 गुणांच्या आधारे.
SSC CGL 2025 – सर्वोत्तम पदे
- Assistant Section Officer (ASO – MEA/IB/CSS): सर्वात प्रतिष्ठेचे व जास्त पगाराचे पद.
- Income Tax Inspector: फील्ड + ऑफिस दोन्ही प्रकारचे काम.
- Excise/Preventive Officer: Customs विभागातील महत्त्वाची भूमिका.
- Divisional Accountant: स्थिर व आर्थिकदृष्ट्या मजबूत करिअर.
अभ्यासक्रम (Syllabus)
- टियर-1 व टियर-2 समान विषयांचा अभ्यासक्रम:
- Reasoning: Series, Coding-Decoding, Puzzle, Seating Arrangement, Venn Diagram, Syllogism
- General Awareness: इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, पर्यावरण, विज्ञान
- Mathematics: Algebra, Geometry, Trigonometry, Mensuration, Percentage, Profit-Loss, Data Interpretation
- English: Grammar, Comprehension, Synonyms-Antonyms, Error Detection, Cloze Test
- Computer Knowledge: MS Word, Excel, PowerPoint, Internet, Email, Networking Basics
- Statistics: Probability, Sampling, Correlation, Regression, Time Series Analysis
का द्यावी SSC CGL परीक्षा?
प्रचंड पदसंख्या (14,582 जागा) – स्पर्धकांसाठी सुवर्णसंधी
सुरक्षित व स्थिर सरकारी नोकरी
उच्च पगार + भत्ते
विविध मंत्रालयांमध्ये संधी
करिअरमध्ये बढती व परदेशी पोस्टिंग
निष्कर्ष
SSC CGL 2025 ही फक्त परीक्षा नसून कितीतरी पदवीधरांसाठी उज्वल भविष्य आहे. योग्य नियोजन, प्रभावी अभ्यासक्रम, मॉक टेस्ट्स व वेळेचे व्यवस्थापन यामुळे ही परीक्षा सहज पार करता येते. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीकडे गांभीर्याने पाहून तयारी करावी.