Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update| संजय गांधी निराधार योजना वाढीव 2500 रूपये मानधन

Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update

Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update : नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात ₹1000 वाढ करण्यात आलेली आहे.

ही वाढ करण्यासाठी 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस होते. या लाभार्थ्यांना दड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. आता ते 2500 रुपये दिले जाईल. राज्यातील संजय गांधी निराधार योजने अंतर्गत (Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update) निराधार पुरुष महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग निराधार विधवा महिलांना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

अधिक वाचा : E-Shram Card Online Apply ( ई-श्रम कार्ड धारकांना मिळणार ३००० रुपये पेन्शन)

सध्या संजय गांधी निराधार योजनेतील 450700 लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना आता दरमहा २५०० रुपये अर्थसाहाय्य देण्यास मंत्रिमंडळामध्ये निर्णय देण्यात आलेला आहे आणि त्याची मान्यता देण्यात आलेली आहे. हे अनुदान ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येईल असं यामध्ये सांगितलेल आहे. यासाठी आवश्यक 570 कोटी रुपयांच्या तरतुदीसाठी मान्यता देखील देण्यात आलेली आहे.

उद्देश (Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update)

  • समाजातील दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य मिळावे म्हणून ही योजना सरकारकडून राबवण्यात येत आहे.

संजय गांधी निराधार योजना काय आहे?

संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेत अशा व्यक्तींना दरमहा मानधन दिले जाते ज्यांना कोणतेही स्थिर उत्पन्नाचे साधन नाही. विशेषतः –

  • निराधार व्यक्ती
  • ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्ती
  • ३५ वर्षांवरील विधवा महिला
  • गंभीर आजाराने ग्रस्त नागरिक
  • अनाथ व बेघर व्यक्ती
  • अत्याचारित महिला
  • वेश्या व्यवसायातून मुक्त महिला
  • तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस
  • ३५ वर्षांवरील अविवाहित निराधार स्री इत्यादी दुर्बल निराधार घटक लाभार्थी आहेत.

अशा लोकांना शासनाकडून थोडासा आर्थिक आधार देऊन त्यांच्या जगण्यास हातभार लावला जातो.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील आर्क
  • वयाचा दाखला – किमान १८ ते ६५ वर्ष (१८ पेक्षा कमी वय पालाकांमार्फात  लाभ )
  • किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी 
  • विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यू दाखला 
  • अनाथ दाखला 
  • उत्पन्नाचा दाखला 
  • आजार प्रमाणपत्र 
  • दिव्यांग- कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ५०००० /-
  • इतर सर्व लाभार्त्यांकारिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा २१०००/-
  • आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवाशी दाखला, अर्जदाराचा फोटो, इत्यादी..
  • अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा १५०० /- लाभ 

वाढीव मानधनाचे महत्त्व

  1. आर्थिक दिलासा
    आतापर्यंत लाभार्थ्यांना १००० किंवा १५०० रुपये एवढेच मानधन मिळत होते. परंतु हे पैसे महागाईच्या तुलनेत अत्यल्प होते. आता वाढीव २५०० रुपयांमुळे त्यांना थोडासा तरी आर्थिक दिलासा मिळणार आहे.
  2. दैनिक खर्च भागविणे सोपे
    अन्नधान्य, औषधे, वीजबिल, प्रवास यांसारखे खर्च वृद्ध व दिव्यांगांना भागविणे अवघड होत होते. आता दरमहा मिळणारे जास्त मानधन यामध्ये मदत करेल.
  3. गरिबी कमी करण्यास मदत
    ग्रामीण व शहरी भागातील असंख्य गरीब कुटुंबांना या योजनेंतर्गत थोडा आर्थिक आधार मिळेल. त्यामुळे गरिबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
  4. सामाजिक सुरक्षा बळकट
    वृद्ध व निराधार नागरिकांना सन्मानाने जगण्यासाठी लागणारा आधार हा शासनाकडून मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास टिकून राहतो.

अर्ज कुठे करावा? (Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update)

  1. ऑनलाईन अर्ज करण्याकरिता शासनाच्या सेवा केंद्रामधून (CSC) किंवा महा- ऑनलाईन पोर्टल द्वारे अर्ज करता येतो.
  2. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करून शकता .
  3. अर्ज केल्यानंतर अर्ज पडताळणी ग्रामसेवक/तलाठी/नगरपालिका कर्मचारी तपासणी करतात.
  4. मानधनाची मंजुरी ही पात्रता निश्चित झाल्यानंतर अर्जदाराला थेट बँक खात्यात मानधन जमा केले जाते.

शासनाचा निर्णय महत्त्वाचा का आहे?

महागाईमुळे सामान्य नागरिकांना आपले दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. विशेषतः काम करण्यास असमर्थ असलेले वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि निराधार यांना जगणे कठीण झाले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे-

  • वृद्धांना त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मदत होईल.
  • दिव्यांगांना त्यांच्या दैनंदिन जीवनात थोडा दिलासा मिळेल.
  • विधवा व निराधार महिलांना आर्थिक आधार मिळून त्यांना आत्मसन्मानाने जगता येईल.

सामाजिक दृष्टिकोनातून फायदे(Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update)

  • समाजातील दुर्बल घटकांना आधार मिळणे म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित होण्यास मदत.
  • शासकीय मदतीमुळे अनेक वृद्धांना कुटुंबावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.
  • ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा मिळेल, ज्यामुळे ग्रामीण विकासालाही चालना मिळेल.

निष्कर्ष

संजय गांधी निराधार अनुदान योजना या महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या जीवनाशी निगडित आहेत. शासनाने या योजनेंतर्गत मानधन २५०० रुपयांपर्यंत वाढविण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, त्यांच्या गरजा भागविण्यास मदत होईल तसेच सामाजिक सुरक्षिततेची भावना बळकट होईल.

महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे निराधार, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना नवे बळ मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल, हीच अपेक्षा आहे.

Leave a Comment