Gramsevak Bharti Update 2025
Gramsevak Bharti Update 2025 : नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवक भरती 2025 बाबत बऱ्याच इच्छुक उमेदवारांच्या मनात प्रश्न आहेत – जाहिरात येणार का? पात्रता काय असेल? नावातला बदल, पगारात वाढ, आणि इतर काय बदल होतील? चला तर मग सविस्तर पाहूया या सर्व मुद्द्यांची माहिती:
1. नावात बदल – ग्रामसेवक की ग्रामपंचायत अधिकारी?
पूर्वी “ग्रामसेवक” म्हणून ओळखले जाणारे हे पद आता “ग्रामपंचायत अधिकारी” या नावाने ओळखले जात आहे. शासनाने अधिकृतरीत्या नावात बदल केला असून त्यामुळे भरती प्रक्रियेवर, जबाबदाऱ्यांवर आणि इतर बाबींवर थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे.
2. पात्रता – 12वी की पदवी?
सध्याची पात्रता: किमान १२वी पास + ६०% गुण आवश्यक
MPSC प्रमाणे शैक्षणिक अटी लागू.
अपेक्षित बदल 2025 मध्ये :
- एक कमिटी नियुक्त करण्यात आलेली होती जी पात्रतेत बदल सुचवणार होती.
- पदवीधर उमेदवारांना संधी देण्याचा विचार सुरू आहे.
- म्हणजेच, 12वी + 60% ही अट कायम राहू शकते किंवा फक्त “पदवीधर” पात्र” अशी नवीन अट लागू होण्याची शक्यता आहे.
- टीप: पदवी असलेल्या पण बारावीला 60% नसलेल्यांना पूर्वी अपात्र ठरवलं जात होतं, ते अयोग्य वाटत असल्याने यावर विचार सुरू आहे.
3. MSCIT – आवश्यक आहे का?
- होय, MSCIT सर्टिफिकेट अनिवार्य असेल.
- पूर्वी सूट दिली होती, पण आता MSCIT असणे अनिवार्य असेल.
- कोर्स पूर्ण करून ठेवणे आवश्यक आहे.
सविस्तर माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा ⏬
4. पगार – बदल होणार का?
सध्याचा पगार:
15,000 ते 16,000 रुपये कंत्राटी स्वरूपात पहिल्या 3 वर्षांसाठी.
अपेक्षित बदल:
- कंत्राटी पद्धत रद्द होऊन स्थायी पद भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- तलाठीसारखी थेट सरकारी नोकरी असावी यासाठी चर्चा सुरू आहे.
5. वयोमर्यादा – काय असेल?
- सामान्य वर्ग: 18 ते 38 वर्षे
- इतर मागास (OBC): 43 वर्षे
- प्रकल्पग्रस्त, अनाथ, अपंग, इ. सवलतींना: 45-47 वर्षांपर्यंत सवलत.
6. सिलॅबस – कृषी घटकाचं महत्त्व
- कृषी विषयाला 40% वेटेज असतो.
- कृषी पदविका किंवा कृषी अभ्यास असलेल्या उमेदवारांना मोठा फायदा होतो.
- अभ्यासात कृषी, ग्रामपंचायत कायदे, संगणक, सामान्य ज्ञान, मराठी व गणित हे घटक अपेक्षित आहेत.
लहान कुटुंब प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (Small Family Certificate) आवश्यक आहे.
- 2006 नंतर विवाह झालेल्यांसाठी लागू आहे.
महत्वाची माहिती:
- भरती निश्चित होणार आहे, कारण दरवर्षी निवृत्तीनुसार नवीन पदांची गरज भासते.
- पात्रता बदलण्याची शक्यता आहे, म्हणून 12वी आणि पदवी दोन्हीच्या तयारीसाठी सज्ज रहा.
- MSCIT, लहान कुटुंब प्रमाणपत्र इ. आवश्यक कागदपत्रे अगोदरच पूर्ण करून ठेवावीत.
- कृषी विषयावर भर द्या – तो निर्णायक ठरतो.
- तुम्ही ग्रामसेवक भरतीची तयारी करत असाल तर वेळ वाया न घालवता तयारीला लागा.
- कुठल्याही क्षणी जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते.