Maharashtra HSRP Number Plate Online Apply 2025 | घरबसल्या HSRP नंबर प्लेट कशी मागवावी? संपूर्ण मराठी मार्गदर्शक

Maharashtra HSRP Number Plate Online Apply 2025

Maharashtra HSRP Number Plate Online Apply 2025 : मित्रांनो, महाराष्ट्रात सर्व वाहनमालकांसाठी HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेट लावणे आता अनिवार्य केले गेले आहे. दंड टाळण्यासाठी आणि वाहनाची सुरक्षा वाढवण्यासाठी ही नंबर प्लेट अतिशय महत्त्वाची आहे.

या ब्लॉगमध्ये आपण (Maharashtra HSRP Number Plate Online Apply 2025) घरबसल्या इंटरनेटद्वारे HSRP नंबर प्लेट कशी मागवायची? कोणती वेबसाईट वापरायची? कोणती माहिती लागते? पेमेंट कसे करायचे? अपॉईंटमेंट कशी बुक करायची? या सर्व गोष्टींची स्टेप-बाय-स्टेप संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

हा ब्लॉग (Maharashtra HSRP Number Plate Online Apply 2025) शेवटपर्यंत नक्की वाचा, जेणेकरून तुम्ही कुठेही चूक न करता अतिशय सोप्या पद्धतीने HSRP Plate ऑर्डर करू शकता.

अधिक वाचा : Meesho मधून पैसे कसे कमवायचे 2025 मध्ये? Meesho Affiliate Marketing Complete Guide in Marathi

HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?

HSRP म्हणजे High Security Registration Plate. हे विशेष सुरक्षा फिचर्ससह तयार केलेले नंबर प्लेट आहे जे:

  • बनावट नंबर प्लेट रोखते
  • चोरी झालेल्या वाहनांचा मागोवा घेण्यासाठी मदत करते
  • Centralised database मध्ये तुमच्या वाहनाची नोंद होते
  • सरकारी नियमांनुसार अनिवार्य आहे

HSRP नंबर प्लेट ऑनलाइन कशी मागवायची? (Step-by-Step Process)

स्टेप 1: गुगल वर सर्च करा

सुरुवातीला तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर Google उघडा आणि शोधा:

“HSRP Number Plate Apply Online Maharashtra”

पहिल्या क्रमांकाला Apply High Security Registration Plate Online अशी वेबसाईट दिसेल.
👉 त्यावर क्लिक करा.

स्टेप 2: जिल्हा सिलेक्ट करा

क्लिक केल्यानंतर एक छोटासा बॉक्स ओपन होईल.

  • Select Office वर क्लिक करा
  • तुमच्या वाहनाची पासिंग ज्या जिल्ह्यातून झाली आहे तो जिल्हा निवडा
  • आणि Submit करा

यानंतर अधिकृत HSRP वेबसाईट ओपन होईल.

स्टेप 3: Order Now वर क्लिक करा

वेबसाईटवर खाली निळ्या रंगात Order Now दिसेल.
👉 त्यावर क्लिक करा.

एक पांढरा बॉक्स ओपन होईल तो Close करा.

स्टेप 4: वाहनाची मूलभूत माहिती भरा

इथे अनेक महत्त्वाची माहिती भरायची असते:

1) Vehicle Registered State

  • Maharashtra असे ऑटोमॅटिक दिसेल.

2) Affixation Location

  • Dealer Premises निवडा.

3) HSRP Order Type

  • Complete HSRP Kit for Old Vehicle हा ऑप्शन निवडलेला असू द्या.

4) Registered Address Pin Code

  • तुमच्या एरियाचा पिनकोड टाका.

5) Vehicle Registration Number

  • तुमचा संपूर्ण गाडी नंबर (उदा. MH12AB1234) टाका.

6) Chassis Number (Last 5 Digits)

  • गाडीच्या RC मध्ये दिलेला चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक.

7) Engine Number (Last 5 Digits)

  • इंजिन नंबरचे शेवटचे 5 अंक.

8) Owner Mobile Number

  • तुमचा चालू मोबाईल नंबर.

👉 सर्व माहिती RC book नुसार नीट तपासा.
👉 आणि Verify with Vehicle वर क्लिक करा.

स्टेप 5: जवळचे HSRP केंद्र निवडा

यानंतर नवीन पेज उघडेल.

  • तुमचा जिल्हा निवडा
  • तुमच्या एरियातील जवळचे HSRP Center निवडा

यानंतर खाली:

  • Appointment Date (Dark अक्षरात दिसणारी उपलब्ध तारीख) निवडा
  • Appointment Slot निवडा

👉 आणि Next वर क्लिक करा.

स्टेप 6: वाहनाचा प्रकार निवडा

नवीन पेज ओपन होईल.

  • Vehicle Registration Date ऑटोमॅटिक
  • Vehicle Type: Motorcycle / Scooter / Car जे काही असल्यास ते सिलेक्ट करा
  • Vehicle Class – Auto
  • Fuel Type – Auto
  • Engine Type – Auto

Owner Name

  • RC book वर जसे आहे तसेच Owner Name लिहा.

स्टेप 7: बिलिंग अ‍ॅड्रेस भरा

पुढील पेजवर तुमचा RC Book वरचा पूर्ण पत्ता भरा.

Email टाकणे ऐच्छिक आहे.

👉 आणि Next वर क्लिक करा.

स्टेप 8: मोबाईल नंबर OTP Verify करा

  • “Click here to request OTP” वर क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला OTP टाका.
  • खाली दिलेल्या बेरीज/वजाबाकीचे उत्तर टाका.

👉 आणि Verify OTP करा.

स्टेप 9: Payment करा (₹531)

नवे पेज ओपन होईल.

  • खाली Pay ₹531 असे दिसेल ते क्लिक करा.
  • Payment Page उघडेल.

इथे:

  • QR वर क्लिक करा
  • BHIM UPI निवडा
  • Make Payment वर क्लिक करा
  • तुमच्या PhonePe / Google Pay ने QR स्कॅन करून पेमेंट करा

पेमेंट यशस्वी झाल्यावर स्क्रीनवर:

“Your HSRP Request Has Been Submitted Successfully”

असे दिसेल.

स्टेप 10: Receipt Print करा

  • हिरव्या रंगात Print Here दिसेल
    👉 त्यावर क्लिक करा
    👉 Receipt डाउनलोड करा
    👉 प्रिंट काढून ठेवा

ही Receipt घेऊन दिलेल्या अपॉइंटमेंटच्या दिवशी HSRP Center वर जा आणि तुमच्या वाहनाला HSRP Plate फिट करून घ्या.

HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • RC Book
  • Payment Receipt
  • वाहनाची प्रत्यक्ष गाडी

HSRP Plate चे फायदे

✔ वाहन चोरीचा धोका कमी
✔ बनावट प्लेट रोखते
✔ डिजिटल डेटाबेसमध्ये वाहनाची नोंद
✔ पोलिस तपासणीमध्ये प्रॉब्लेम नाही
✔ अनिवार्य नियमांचे पालन

निष्कर्ष

महाराष्ट्रात घरबसल्या HSRP नंबर प्लेट मागवणे अत्यंत सोपे आहे. फक्त 10–15 मिनिटांत तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरू शकता, पेमेंट करू शकता आणि जवळच्या HSRP सेंटरमध्ये अपॉइंटमेंट बुक करू शकता. नियमांचे पालन करण्यासाठी आणि दंड टाळण्यासाठी आजच (Maharashtra HSRP Number Plate Online Apply 2025) ही प्रक्रिया पूर्ण करा.

Leave a Comment